Thursday, November 12, 2009

News about distribution of cycles, Computer, Mobile by VSM, Thane to students from SHAHAPUR on 8th Nov. 2009.

Please note that by mistake name of ANANDWAN SNEHI MANDAL has been published instead of Vidyadan Sahayyak Madal, Thane.
--------------------------------------------------------------------------------
ठाणे + कोकण

प्रगतीसाठी खारीचा वाटा
13 Nov 2009, 0455 hrs IST


म. टा. प्रतिनिधी

आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याची परंपरा ठाण्यातील आनंदवन सहाय्यक मंडळाने जपली असून या मंडळाच्या स्वयंसेवकांनी शहापूरच्या आदिवासी पाड्यातील नऊ विद्यार्थ्यांना सायकली, एक कम्प्युटर आणि एक मोबाइल फोन, पुस्तकांची भेट नुकतीच दिली.

साकेत टॉवरमध्ये राहणाऱ्या सुहास चांदेकर यांनी परिसरातील रहिवाशांकडून सात भंगार सायकली जमा केल्या. तर, डॉ. प्रसाद कणिर्क यांनी त्यांच्या दोन मुलींच्या सायकलीदेखील मंडळाकडे दिल्या होत्या. या सायकली दुरुस्त करून गोरगरीब विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. शहरी भागातील अनेक मुलांकडे सायकली असतात. वय वाढल्यानंतर या सायकलींची जागा 'टू व्हीलर' घेतात आणि तिथून सायकलचा वनवास सुरू होतो. प्रत्येक इमारत आणि सोसायटीत अशी मान मोडून पडलेली सायकल असतेच! या उलट चित्र आदिवासी पाड्यात दिसते. नशिबी दारिद्य असल्याने सात-सात किलोमीटरचे अंतर पायी तुडवत या मुलांना शाळा गाठावी लागते. एसटीची सोय असते परंतु, त्याचे सहा आणि सात रुपयांचे भाडे या गरिबांना कुठून परवडणार. त्यामुळेच आदिवासींसाठी ही सायकल म्हणजे मसिर्डीजसमानच! सायकल मिळाल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय होता.

विलेपालेर् येथे राहणाऱ्या मिलिंद पिटकर यांनी घरातला कम्प्युटरही शहापूरच्या विद्यार्थ्यांसाठी दिला आहे. मंडळाचेच कार्यकतेर् असलेल्या ज्ञानेश्वर पष्टे यांनी त्यांचा मोबाइल शहापूर येथील मुलींच्या वसतीगृहाला दिला आहे. या मोबाइलमुळे वसतीगृहाशी संपर्क शक्य होणार आहे. तसेच, या शाळेतील मुलांची वाचनाची आणि संभाषणाची कला वाढावी यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. भाजपचे आमदार संजय केळकर यांनी या विद्यार्थ्यांसाठी काही पुस्तके दिली असून त्यातून येथे एक वाचनालय सुरू करण्यात आले आहे. या मुलांना परीक्षेचा ताण जाणवू नये यासाठी स्वाती आगटे यांनी 'प्राणायाम'चे धडेही दिले. या शाळेत एक इंग्लिश डिक्श्नरी देण्यात आली आहे. या भागातील एक सजग शिक्षक सुभाष हरड विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असून त्यांनीच मंडळाच्या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची निवड केली आहे. मंडळाचे कार्यकतेर् नियमितपणे या शाळेला भेट देऊन तेथील समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात. मंडळाच्या या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९९२०३ ६७५७० किंवा ९८२१० ३४४३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment