अंधारातील प्रकाशवाटा
22 Sep 2009, 0159 hrs IST
>> म. टा. प्रतिनिधी
शहापूर तालुक्यातील नारायणगावातल्या झोपडीत राहणारा गणेश जयराम शिकेर् या मुलाने शाळेसाठी रोजची १० किलोमीटरची पायपीट करत दहावीत ९० टक्के गुण मिळवले. रॉकेलच्या दिव्यावर अभ्यास करुन हे यश मिळवणारा गणेश सध्या मुंब्य्राच्या सरकारी पॉलिटेक्निकमध्ये शिकतोय. स्वत:चे घर नसल्याने काकांच्या घरातल्या एका कोपऱ्यात बसून अभ्यास करुन बारावीला ७६ टक्के गुणांची कमाई करणारी मधुरा पांडुरंग विशे आता डी.एड् करतेय. तर, योगेश बुंदेचे वडिल नाका कामगार तर आई मोलमजुरी करते. दहावीच्या परिक्षेच्या आधी आलेल्या आजारपणामुळे १५ दिवस अंथरुणाला खिळलेला असतानाही ९१ टक्के गुण त्याने मिळविले. असामान्य जिद्दीच्या जोरावर अनेक अडचणींवर मात करत यशाचे शिखर गाठणाऱ्या या मुलांच्या कौतुक सोहळ्यात जमलेल्या प्रत्येकाचे डोळे पाझरत होते. विद्यादान सहाय्यक मंडळाच्या प्रथम वर्धापनानिमित्ताने किन्हवलीच्या शहा चंदुलाल स्वरुपचंद विद्यालयात हा कौतुक सोहळा रंगला होता.
बाबा आमटे यांच्या कार्याने प्रेरीत होऊन २००३ साली ठाण्यात आनंदवन स्नेही मंडळ जन्माला आले. त्यावेळी भाऊ नानिवडेकर, जयंत, मोकाशी, मीनाताई पाटणकर या जेष्ठांनी त्यासाठी पुढाकार घेतला. अनिकेत आमटे यांनी हेमलकासा प्रकल्पाच्या एका प्रदर्शनात भाऊंनी अभिप्रायासाठी ठेवलेल्या वहीतून गीता व सत्यजीत शहा, डॉ. प्रसाद कणिर्क, स्वाती आगटे, रंजना कुलकणीर्, जोत्स्ना कदम असे ताज्या दमाचे १० ते १२ कार्यकतेर् मंडळाकडे गोळा झाले. त्यानंतर या मंडळाचे स्वरुप बदलले. सामाजिक कार्य करावे या विचाराने १५ ऑगस्ट, २००८ रोजी विद्यादान सहाय्यक मंडळाची स्थापन झाली. सुभाष हरड या पत्रकाराने प्रशांत विशे विद्यार्थ्याच्या असामान्य कर्तृत्वाची केलेली बातमी या कार्यर्कत्यांच्या वाचनात आली आणि समाजकारणाच्या विधायक कार्याला दिशा मिळाली. ६ दाते, ७ विद्याथीर् आणि ५० हजार रुपयांची गंगाजळीने सुरुवात झालेल्या या संस्थेतल्या दानशुरांची संख्या वर्षभरात ३० वर पोचली असून २५ गरीब आणि गुणवंत मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न त्यातून मागीर् लागला आहे. या विद्यार्थ्यांची सर्व जबाबदारी मंडळाने उचलली आहे. अभ्यासासाठी जागा, सरकारी वसतीगृहांमध्ये राहण्याची सोय यांच्यातफेर् करण्यात आली आहे. आ. संजय केळकर यांनी त्यासाठी सहकार्य केले.
मदतीचा हा हाताने गुणवंत विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. प्रशांत गायकवाड हा मुलगा उल्हासनगर रेल्वे स्टेशनातील स्टॉलवर कपबशा विसळण्याचे काम करायचा. त्यानंतरही त्याने दहावीत ८३ टक्के गुण मिळविले. मात्र, पुढे शिक्षणासाठी पैसे नसल्याने तो पुन्हा अंधेरीच्या एका हॉटेलात काम सुरू केले. परंतु, सुभाष हरड यांनी त्याला शोधून काढलं. त्याला आथिर्क मदत मिळवून दिली. त्यानंतर बारावीला ७२ टक्के गुण मिळविणारा प्रशांत आता बिर्ला कॉलेजातून बीएस्सी करतोय. अशाच गुणवंतांचा सत्कार सोहळा किन्हवलीत नुकताच रंगला. कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेतल्या मुलामुलींनी रानफुले देऊन केले. आ. संजय केळकर यांनी या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मदतीबद्दल मुलांनी कृतज्ञता ठेवावी परंतु, त्याचा न्यूनगंड बाळगू नये असे यावेळी कवी भगवान जाधव यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment